बेळगाव : सोमवार दिनांक 13 डिसेंबरपासून बेळगावच्या सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील अनेक कामे हाती घेण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर एलईडी दिवे बसवण्याचे काम आहे जोरात सुरू झालेले पाहायला मिळत आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून बेळगाव शहरात सर्वत्र एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. शहरात जितके खांब आहेत त्या सर्व खांबांवरील सध्याचे मरकुरी किंवा सोडियम व्हेपर दिव्यांच्या जागी एलईडी दिवे लावण्याची योजना आहे.
बीओटी तत्वावर ही योजना राबविण्यासाठी स्मार्ट सिटी विभागाकडून निविदा काढण्यात आली. चार महिन्यांपूर्वी प्रक्रिया पूर्ण होऊन बेंगलोरच्या साउथ लाईन कंपनीला यासाठी ठेका मिळाला होता. कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली होती. परंतु काम सुरू करण्यासाठी विलंब झाला होता.
आता मात्र हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवर एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Check Also
सुवर्ण महोत्सवी “ज्वाला” दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
Spread the love बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली “ज्वाला”ची वाटचाल महोत्सवी वर्षापर्यंत पोचली आहे. …