
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग, यांच्या संयुक्त आश्रयाने जिल्हास्तरीय दसरा हाॅकी क्रीडा स्पर्धांचे मेजर सय्यद हाॅकी मैदानावर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जी जी चिटणीस स्कूल, भंडारी स्कूल, सेंट जॉन, फिनिक्स स्कूलच्या क्रीडांपटूनी सहभाग घेतला होता.
दसरा जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमध्ये मुलांच्या संघातून हाॅकी बेळगाव तर मुलींच्या संघातून जी जी चिटणीस स्कूल तसेच उपविजेतेपद भंडारी स्कूल व हाॅकी बेळगाव यांची निवड झाली.
प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी प्रास्ताविक केले तर प्रमुख पाहुणे घुळाप्पा होसमणी व अर्जुन अवार्ड विजेते मुकुंद किल्लेकर यांच्या हस्ते विजयी संघांना प्रशस्तीपत्र व ट्राॅफी देण्यात आली. सचिव सुधाकर चाळके यांनी हाॅकीची माहिती दिली.
हाॅकी बेळगावचे अध्यक्ष घुळाप्पा होसमणी, अर्जुन अवार्ड विजेते मुकुंद किल्लेकर, प्रकाश कालकुंद्रीकर, उत्तम शिंदे, मनोहर पाटील, विकास कलघटगी, आशा होसमणी, नामदेव सावंत, गौरव जाधव, प्रवीण पाटील, रमेश कांबळे, जयसिंग धनाजी, प्रशांत गायकवाड, प्रशांत खराडे, समीउल्ला आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta