Wednesday , December 10 2025
Breaking News

बेळवट्टी महालक्ष्मीतर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : बेळवट्टी – बाकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीच्या सतराव्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ज्येष्ठ नागरिक व गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. बी. देसाई होते.
संचालक रामलिंग देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष लुमाण्णा नलावडे, नामदेव पाटील, शंकर देसाई, बाळू कांबळे, शंकर गोडसे, मारुती कांबळे, सुरेश मजुकर आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. दत्तू नलावडे यांनी गणेश पूजन केल्यानंतर मनोहर सांबरेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन, बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी देवीचे तर पुंडलिक चांदीलकर यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई देवीचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर दहावी, बारावी व पदवी परीक्षेत विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुलांचा गौरव करण्यात आला. उपाध्यक्ष परसराम गाडेकर, संचालक अर्जुन पाटील, मारुती नलावडे, दत्तू नाईक यांच्यासह ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याचवेळी आदर्श ठेवीदार, आदर्श कर्जदार, पिग्मीधारक यांचाही सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सोसायटीच्या व्यवस्थापिका मयुरी हरगुडे यांनी सादर केलेल्या संस्थेच्या अहवालाला मंजुरी देण्यात आली. अध्यक्ष बी. बी. देसाई यांनी संस्थेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या कार्यालयाच्या इमारतीची माहिती देऊन, लवकरच नव्या इमारतीत सोसायटीचे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे सांगितले. सोसायटीच्या संपूर्ण व्यवहाराचे संगणकीकरण करण्यात येणार असून सभासदांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
संचालक नारायण नलावडे, पांडुरंग नाईक, अशोक मजुकर यांनी संस्थेने केलेल्या कार्याचा गौरव केला. संचालक आर. बी. देसाई यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष परशराम गाडेकर, संचालक नारायण नलावडे, पांडुरंग नाईक, आप्पू नाकाडी, अर्जुन पाटील, तुकाराम कांबळे, मधू नलावडे, अशोक मजुकर, सावित्री चौगुले, वैष्णवी सुतार, निर्मला गायकवाड व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भोवी-वडर समाजाच्या विकासासाठी बेळगावात आज नेते मंडळींचे मार्गदर्शन

Spread the love  निपाणी (वार्ता) : भोवी-वडर समाज विकास निगममधून समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *