Wednesday , March 4 2026
Breaking News

रामदेव गल्ली येळ्ळूर येथे नामफलकाचे उद्धाटन

Spread the love

 

येळ्ळूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामदेव गल्ली येळ्ळूर यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी युवक मंडळाच्या नामफलकाचे उद्धाटन सिव्हिल इंजिनिअर चांगदेव कंग्राळकर व बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर परशराम पावले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी निवृत मुख्याध्यापक गोविंद काळसेकर होते. यावेळी स्वामी विवेकानंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर कृष्णा बिजगरकर, रमेश धामणेकर, दौलत पाटील मनोहर पाटील, बाळकृष्ण कंग्राळकर, प्रभाकर कंग्राळकर, बाबू मंगनाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सुत्रसंचलन के. एस. कंग्राळकर यांनी केले तर आभार सचिन देसाई यांनी मानले.

यावेळी राजू सुळगेकर, सचिन देसाई, प्रशांत कुंडेकर, निखिल चाळके, राहुल सुळेभावी, सुरज तम्मूचे, विनोद पाखरे, श्रीधर पाखरे आदी यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *