Wednesday , December 10 2025
Breaking News

माध्यमिक फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, सेंटपॉल्स शाळेला विजेतेपद

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय माध्यमिक मुला -मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा व सेंटपॉल बेळगाव शहराने विजेतेपद पटकाविले.
मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सर्वोदय स्कूल खानापूरने महावीर भगवान बेळगांव तालुक्याचा 1-0 असा पराभव केला विजयी संघाच्या बेला फर्नाडीस एक गोल केला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत मीरा बेळगांव शहराने बैलहोंगल तालुक्याचा 3-0 असा पराभव केला विजयी संघाच्या चैत्रा ऐमोजी 2 गोल, रेनिवार मालशोय 1गोल, अंतिम सामन्यात संत मीरा बेळगांव शहराने सर्वोदय स्कूल खानापूरचा 3-0 असा पराभव केला विजयी संघाच्या चैत्रा ऐमोजी रेनिवार मालशोय खोबोरोज यांनी प्रत्येकी 1गोल केला. मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंटपॉल शाळेने बैलहोंगल तालुक्याचा 3-0 असा पराभव केला विजयी संघाच्या जोसवा, अनिष केसरकर, जतिन बेपारी यांनी प्रत्येकी एक गोल केला.दुसऱ्या उपांत्य सामन्यात सर्वोदय स्कूल खानापूरने ज्ञान प्रबोधन शाळेचा 3-0 असा पराभव केला विजयी संघाच्या मिल्टन फणाडीस 2, स्टीवन फणाडीसने 1 गोल केला, अंतिम लढतीत सेंटपॉल शाळेने सर्वोदय स्कूल खानापूरचा 2-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून टिळकवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी, जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी डी एस दिग्रज, आर पी वटंगुडी, विवेक पाटील, बापुसाहेब देसाई, जयसिंग धनाजी, चंद्रकांत पाटील, संतोष दळवी, उमेश मजुकर, देवेंद्र कुडची, अन्थोनी डिसोझा, ज्यो डिसोजा, जोसेफ परेरा, सुनिल देसाई, आशिक सरकार, ए एस लोबो या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी पंच म्हणून आदित्य सानी, सोहम ताशिलदार, प्रणव देसाई, देवेश मडकर यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

भोवी-वडर समाजाच्या विकासासाठी बेळगावात आज नेते मंडळींचे मार्गदर्शन

Spread the love  निपाणी (वार्ता) : भोवी-वडर समाज विकास निगममधून समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *