Monday , September 21 2026
Breaking News

हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी, जनता दर्शनात निवेदन; आश्वासन

Spread the love

 

बेळगाव : बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास न्यावी, असे निवेदन संस्थेतर्फे विकास कलघटगी यांनी आज जनता दर्शन कार्यक्रमात दिले.
आमदार राजू सेठ व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले व त्वरित बुडा आयुक्त शकील अहमद यांना बोलावून तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
बेळगांव हे हाॅकी प्रेमींचे माहेर घर आहे. आज जिल्ह्यात 500 हून अधिक खेळाडू हाॅकीचा नित्यनेमाने सराव करीत आहेत, परंतु ॲस्ट्रोटर्फ मैदानाची कमतरता असल्याने राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, अशी माहिती सचिव सुधाकर चाळके यांनी सांगितली.
यावेळी सचिव सुधाकर चाळके, प्रकाश कालकुंद्रीकर, मनोहर पाटील, नामदेव सावंत, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *