बेळगाव (वार्ता) बेळगाव शहरात नवसाला पावणाऱ्या गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला खडक गल्ली येथील गणेशोत्सवाच्या 75 वर्षाचे औचित्य साधून बेळगाव येथील 100 वर्षाची परंपरा असलेल्या हंडे बंधूनी 21 किलोचा आईस्क्रीम मोदक साकारला व तो खडक गल्लीच्या राजाला अर्पण केला.
बेळगावातील हंडे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील यशराज व हृषीकेश यांच्या संकल्पनेतून या मोदकांनी आकार घेतला. सातत्याने 3 दिवस परिश्रम घेऊन हा मोदक बनविण्यात आला. याकामी त्यांना कुटूंबातील सर्वांचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः कु.श्रेया व वेदिका यांनी सहकार्य केले.
मंडळांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या वेळी सदर मोदक गणरायाला अर्पण करून भक्ताना प्रसाद वाटण्यात आला.इतका भला मोठा आईस्क्रीमचा मोदक व त्याचे आयोजन पाहून सर्वानी हंडे बंधूंचे कौतुक केले. नरगुंदकर भावे चौक येथील लक्ष्मी, किर्लोस्कर रोड येथील इंपिरियल व हुतात्मा चौक येथील कावेरी या व्यवसायातून सुमारे 100 वर्षांपासून हंडे कुटुंबीय बेळगावकराच्या सेवेत रुजु आहेत.
गणपती बाप्पाचे आवडतं नैवेद्य मोदक, वेगवेगळ्या पदार्थातून बनवलेला आपण या अगोदर पाहिलेले आहे. बेळगावत पहिल्यांदाच आईस्क्रीम मधील मोदक बनवून गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून सादर करण्यात आला आईस्क्रीम विक्री व्यवसायिक असलेले कावेरी कोल्ड ड्रिंक्स (हंडे) परिवाराकडून हा उपक्रम राबवण्यात आला.