
बेळगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (सीमाभाग), बेळगाव जिल्हा यांच्यावतीने आयोजित यंदाची ‘सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा -2023’ प्रथम क्रमांकासह सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ पाटील मळा, बेळगाव या मंडळाने जिंकली आहे.
दरवर्षीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (सीमाभाग) बेळगाव जिल्हा यांच्यावतीने यावर्षी देखील सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परीक्षकांच्या निर्णयानुसार बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण भागातून प्रत्येकी तीन श्री मूर्तींना पहिले तीन क्रमांक देण्यात आले आहेत. स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. बेळगाव उत्तर विभाग : प्रथम क्र. -सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ पाटील मळा बेळगाव द्वितीय क्र. -सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ सिंह गर्जना युवक मंडळ कोनवाळ गल्ली बेळगाव, तृतीय क्र. -सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ बसव कॉलनी बॉक्साइट रोड बेळगाव. बेळगाव दक्षिण विभाग : प्रथम क्र. -सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ सोनार गल्ली वडगाव, द्वितीय क्र. -सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ महाद्वार चौक महाद्वार रोड बेळगाव, तृतीय क्र. -सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ गोवावेस रामलिंगवाडी शहापूर.
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल मंगळवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. उत्तर विभागामध्ये सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ पाटील मळा बेळगाव येथे तर दक्षिण विभागामध्ये सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ सोनार गल्ली वडगाव येथे आयोजित या समारंभात शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत आणि उपशहर प्रमुख प्रवीण तेजम यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख राजू कणेरी, प्रकाश हेब्बाजी, मयुरेश काकतकर, प्रदीप सुतार आदींसह बहुसंख्य शिवसैनिक व गणेश भक्त उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta