बेळगाव : बेळगाव तालुक्यात नियोजित रिंगरोडला बेळगाव शेतकऱ्यांनी न्यायालयीन स्थगिती घेतली आहे. यामुळे या स्थगिती संदर्भात व रिंगरोड रद्द करण्यासंदर्भात शेतकऱ्यांची बैठक बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कॉलेज रोड (पवन हॉटेलच्या बाजूला) कार्यालयात सोमवार दिनांक २ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना रिंगरोड विरोधातील पुढील न्यायालयीन लढा व इतर माहिती देण्यासाठी व लढ्याची रूपरेषा ठरविण्यासाठी, तसेच या लढ्यासंदर्भात शेतकऱ्यांची आपले म्हणणे मांडण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला ज्या शेतकऱ्यांची रिंगरोडमध्ये जमीन गेलेली आहे त्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील व युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी यांनी कळविले आहे.