
वर्धापन दिनानिमित्त माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा दोन गटाकरिता आयोजन
बेळगाव : बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळ गेली ३३ वर्षे मराठी कविता आणि कवींसाठी कार्यरत आहे. मंडळातर्फे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून बेळगावातील काव्य परंपरा समृद्ध करण्याचे कार्य करते आहे. ३३व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शब्दगंध काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी अशा दोन गटासाठी असून यामध्ये केवळ सीमावर्ती भागातील विद्यार्थी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. काव्य लेखनाला विषयाची मर्यादा नसून कोणत्याही विषयावरची एक उत्कृष्ट स्वरचित कविता पाठवायची आहे.
स्वरचित कविता मोबाईलवर टाईप करून त्याखाली कवीचे नाव, संपर्क क्रमांक, वर्ग आणि शाळेचे नाव लिहून ती आयोजकांच्या 9019992951 या क्रमांकावर २० ऑक्टोबरपर्यंत पाठवून द्यावी. प्रत्येकी गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ दोन अशा विजेत्या कवींना सन्मान चिन्ह, काव्यसंग्रह आणि रोख रक्कम देऊन वर्धापन दिन कार्यक्रमात गौरविण्यात येणार असल्याची माहिती शब्दगंध कवी मंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta