
येळ्ळूर : नेहमीच समाज कार्यत अग्रेसर असलेल्या येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने खास दसरोत्सवानिमित्त शनिवार (ता. 21) व रविवार (ता. 22) रोजी परमेश्वर नगर येळ्ळूर येथील नेताजी मराठी संस्कृतिक भवन येथे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरोगामी विचारसरणी असलेल्या येळ्ळूर गावांमध्ये प्रथमच या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर स्पर्धा बेळगांव तालुका मर्यादित असणार आहे. स्पर्धेसाठी पहीले बक्षिस 21 हजार रुपये, दूसरे बक्षिस 15 हजार रूपये, तीसरे बक्षिस 11 हजार रुपये, चौथे बक्षिस 7 हजार रुपये व पांचवे बक्षिस 5 हजार रूपये अशी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत, प्रवेश फी 500 रूपये असणार आहे. स्पर्धेसाठी 30 मिनिटांचा कालावधी असणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळाने दोन अभंग व एक गौळण सादर करावयाची आहे. स्पर्धेचे इतर नियम व अटी स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येतील. अधिक माहितीसाठी नेताजी युवा संघटनेचे डी. जी. पाटील मोबाईल 9945549453, प्रा. सी. एम. गोरल मोबाईल 9342813216 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta