
बेळगाव : शिवाजीनगर येथील घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून जीवनश्यकसह प्रापंचिक साहित्य आज (ता.५) जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात नेमकी कितीची हानी झाली आहे, याची नोंद नव्हती. मात्र, लाखोंचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून माहिती अशी, शिवाजीगरला आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात परिसरातील विविध घरातील साहित्य जळाले. यात इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली आहेत. या घनटेमुळे अनेकांना लाखोंचा आर्थिक फटका बसला आहे.
शिवाजीनगर पहिला व दुसरा क्रॉसला आगीत फ्रीज, वॉशिंग, ओव्हनसह इलेक्ट्रिक उपकरणे, दैनंदिन वापराच्या वस्तू, धान्य, कपडे जळाली आहेत. कमी-जास्त दाबाने वीज पुरवठ्याचा सातत्याने त्रास सुरु आहे. याबाबत हेस्कॉमकडे तक्रारी केल्या आहेत.
मध्यंतरी तक्रारीनंतर तात्पुरती दुरुस्ती केली. मात्र, पुन्हा समस्या डोकेवर काढत आहे. त्यातून विविध साहित्य जळून खराब झाले आहे. याबाबत मार्केट पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी रात्री उशिरापर्यंत त्याची नोंद नव्हती.
Belgaum Varta Belgaum Varta