
बेळगाव : ऊस उत्पादक तसेच इतर शेतकऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडून ऊसाला एफआरपीसह योग्य भाव तसेच बेळगाव, खानापूर तालूका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, विकासासाठी पीकाऊ जमीनींचे भूसंपादन त्वरित थांबवून पडिक जमीनीतून विकास साधत अल्पभूधारक शेतकरी वाचवावा, शेतकऱ्यांची पीकं वाचवण्यासाठी त्यांच्या शेतातील कुपनलिकाना निरंतर विजपुरवठा करावा यासह इतर मुख्य मागण्यांसाठी सोमवार दि. 9/10/2023 रोजी सकाळी 11 वाजता कित्तूर चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी, अथणी, चिक्कोडी, गोकाक, बैलहोंगल, कित्तूर, खानापूरसह सीमाभागातील समस्त शेतकरी हजारोंच्या संख्येने हजर राहणार आहेत. तेंव्हा बेळगाव शहर, तालुका परिसरातील शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने हजर होत आपल्या शेतातील वाळलेली पीकं घेऊन ती दाखवण्यासाठी आणावीत असे आवाहन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजू शेट्टी यांच्यासह बेळगाव जिल्हा, तालूका रयत संघटना तसेच हितचिंतक संघटनांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta