
समिती कार्यकर्त्यांच्या बैठकीत आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील हे होते.
1 नोव्हेंबर 1956 साली भाषावर प्रांतरचना झाली. त्यावेळी मुंबई प्रांतातील काही मराठी बहुल भाग हा कर्नाटकात डांबण्यात आला. त्याच्या निषेधार्थ सीमावासीय एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून गांभीर्याने पाळतात. त्या अनुषंगाने मराठा मंदिर येथे समिती कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत येत्या 1 नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त संख्येने समिती कार्यकर्त्यांनी सायकल फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. त्या अनुषंगाने जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी समिती कार्यकर्ते सागर पाटील, येळ्ळूरचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सुनील बोकडे, राजू बिरजे, प्रशांत भातकांडे यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी समिती नेते रमाकांत दादा कोंडुसकर, गुणवंत पाटील, महादेव पाटील, उमेश पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, किरण हुद्दार, धनंजय पाटील, बाळू जोशी, प्रा. आनंद आपटेकर, कपिल भोसले, भावेश बिरजे, रोहन लंगरकांडे, भरत नागरोळी यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta