
बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यातील पुलारकोप्पा व परिसरातील गावातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पुरेशी बस व्यवस्था करावी, या मागणीसाठी कर्नाटक भीमसेनेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सोमवारी शहर, मध्यवर्ती बसस्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली.

जिल्ह्यातील बैलहोंगल व खानापुर तालुक्यातील गावातून दररोज शेकडो विद्यार्थी व नागरिक शहरात ये-जा करतात. मात्र बसेसचा तुटवडा असून वेळेवर बस न सोडता शाळा-कॉलेज सोडण्याची परिस्थिती आहे. पुलारकोप्पासह बैलहोंगल तालुक्यातील विद्यार्थ्यांना पुरेशी बस सेवा नाही. त्यामुळे तातडीने पुरेशी बस उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
यावेळी कर्नाटक भीमसेनेच्या जिल्हाध्यक्षा प्रवीण मदार, उपाध्यक्ष अक्षय के.आर., मल्लप्पा अक्कमड्डी, अजय शिंगे, विजय कोटकार, उदय बासुजी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta