
येळ्ळूर : म्हैसूर येथे होणाऱ्या दसरा राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी नवहिंद क्रीडा केंद्रा येळ्ळूरचा मुलींचा संघ आज रवाना झाला. सदर स्पर्धा म्हैसूर येथे 11/10/2023 ते 13/10/23 पर्यंत होणार आहे. या स्पर्धेसाठी खालील खेळाडूंचा सहभाग आहे. कुमारी सानिका चिट्टी, रसिका कंग्राळकर, प्रणाली बिजगरकर, सानिका गोरल, संध्या पाटील, सानिका बस्तवाडकर, श्वेता कालकुंद्रीकर, निकिता कुट्रे, ऋतुजा सावंत, सोनिया कुगजी, साक्षी पाटील, वैष्णवी मेलगे या सर्व खेळाडूंना नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष श्री. शिवाजी सायनेकर, सेक्रेटरी अनिल हुंदरे, क्रीडा प्रशिक्षक वाय. सी. गोरल सर व क्रीडा प्रमुख सुधीर माणकोजी यांचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta