
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या समोरच ठेकेदाराने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बेळगाव शहरात आज घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, ठेकेदार नागप्पा बांगी यांना 2022 मध्ये कंत्राटी पध्दतीने हलगा ते तिगडी गावापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मिळाले होते. 6 लाख 50 हजारांचे काम ठेकेदाराने यापूर्वीच पूर्ण केले आहे. मात्र काम पूर्ण करून देखील बिल देण्यासाठी कार्यकारी अभियंता टाळाटाळ करत होते. मागील वर्षभरापासून कार्यालयाच्या फेऱ्या मारून कंटाळलेल्या ठेकेदाराने आज चक्क सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता एस. एस. सोबर यांच्यासमोर नागप्पा बांगी या ठेकेदाराने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
किल्ला आवारातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. कंत्राटदार नागाप्पा बांगी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वेळेत काम पूर्ण करून देखील बिल अडवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री याबाबत कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta