
बेळगाव : मण्णूर येथे आंबेवाडी ग्राम पंचायतीच्या निधीतून सीडी व गटार बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला. म. ए. समितीचे नेते आर. एम. चौगुले, ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी यळगुकर व उपाध्यक्ष शंकर सुतार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
आर. एम. चौगुले म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील आवश्यक कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. गावात स्वच्छता तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी सीडी वर्क व गटार बांधकामाची गरज आहे. त्यामुळे सदर काम ग्रामपंचायतीतर्फे हाती घेण्यात आले आहे. या पुढील काळात तातडीची कामे प्राधान्याने करण्याचे प्रयत्न करत आहोत. याला ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
यावेळी ग्रा. पं. सदस्या श्रद्धा सांबरेकर, सरिता नाईक, नागेश चौगुले, दत्तू चौगुले, शंकर सांबरेकर, शिवाजी मंडोळकर, विक्रम यळगूकर, निरंजन अष्टेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta