Tuesday , March 3 2026
Breaking News

एंजल फाउंडेशन आयोजित मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : एंजल फाउंडेशनच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा माणिकबाग येथील जैन बोर्डिंगमध्ये पार पडली. यावेळी जवळपास 16 महिला मंडळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

या स्पर्धेकरीता व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून रहदारी वाहतूक आणि विभागाच्या पोलीस उपायुक्त पी व्ही स्नेहा, जानकी सेवा संघाचे संस्थापक आणि समाजसेवक डॉक्टर उमेश आचार्य आणि त्यांच्या पत्नी गायत्री आचार्य, एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके उपस्थित होत्या.

प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जवळपास 16 महिला मंडळांनी मंगळागौरच्या गाण्यांवर आपली कला सादर केली. याप्रसंगी परीक्षक म्हणून विद्या जोशी आणि पूजा करजोळ उपस्थित होत्या. यावेळी प्रथम क्रमांक नाविन्य महिला मंडळ, द्वितीय क्रमांक रेणुका महिला मंडळ, तृतीय क्रमांक शिवकन्या महिला मंडळ आणि उत्तेजनार्थ स्फूर्ती सांस्कृतिक ग्रुप यांनी पटकाविला. यावेळी विजेत्यांना ट्रॉफी प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी प्रथम क्रमांकाला दहा हजार, द्वितीय क्रमांकाला सात हजार आणि तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये रोख रक्कम प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *