
१७ रोजी निवेदन देणार : येळ्ळूर-धामणे दिंडी कमिटीची बैठक
बेळगाव : येळ्ळूर-धामणे ते पंढरपूर पायी दिंडी कमिटीची बैठक नुकतीच हभप मारुती सांबरेकर महाराज यांचे निवासस्थानी पार पडली.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून बेळगाव जिल्ह्यातून आणि चंदगड भागातून शेकडो वारकरी पंढरपूरला कायम ये-जा करत असतात. परंतु बेळगाव ते पंढरपूर रेल्वेची सोय नाही. त्यामुळे शेकडो पांडूरंगाच्या भक्तांची मोठी गैरसोय झाली आहे. पूर्वी दररोज दुपारी दोन वाजता बेळगाव ते पंढरपूर रेल्वेगाडी होती. ती बंद केल्यापासून वारकऱ्यांची गैरसोय झाली आहे. ती रेल्वेगाडी बेळगाव ते पंढरपूर रेल्वे पुन्हा सुरू करावी, यासाठी मंगळवार दि. १७ ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हाधिकारी आणि खासदार मंगला अंगडी यांना बेळगाव व परिसरातील वारकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरले. त्याचप्रमाणे वैष्णव आश्रम येळ्ळूर-धामणे ते पंढरपूर पायी दिंडीतर्फे पंढरपूर येथे आश्रम बांधण्याचे ठरले. या कामाची सुरुवात नवरात्र उत्सवनंतर करण्याचे सर्वानुमते ठरले.
या बैठकीत दिंडीचे अध्यक्ष हभप बाळू केरवाडकर, सेक्रेटरी हभप अजित पाटील, खजिनदार अजित सांबरेकर, हभप रविंद्र पाटील, हभप मोहन खांबले, सिद्राय जाधव, वसंत डुकरे आदी सदस्य व वारकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta