
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून सीमाभागातील मराठी भाषिकांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या जात आहेत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथे बुधवारी (ता. ११) सीमाप्रश्री आयोजित केलेल्या तज्ञ समितीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीसह इतर विषयांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच, सीमाप्रश्न लवकर निकालात निघावा, यासाठी सर्व गोष्टींची पूर्तता केली जात असल्याचे सांगितले. यावेळी खासदार धैर्यशील माने, आनंद आपटेकर, मंगेश चिवटे, शिवराज सावंत, सागर पाटील, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta