
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बांधकाम कामगार आपल्या वेगवेगळ्या समस्याबद्दल उद्यमबाग येथील जिल्हा कामगार भवनसमोर संघटीतपणे मोर्चात सामील झाले होते. यावेळी कामगारांनी आपल्या तक्रारी जिल्ह्याच्या कामगार अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
ॲड. एन. आर. लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम कामगार संघटना, मजदूर नवनिर्माण संघ आणि अहिंद अॕडव्होकेट्स असोसिएशनतर्फे शुक्रवार दि. 13/10/23 रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान बेळगांव जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त व बेळगांवच्या कामगार अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ॲड. विनोद पाटील, ॲड. यशवंत लमाणी, ॲड. मस्ती, ॲड. हेडगे, मजदूर नवनिर्माण संघाचे कार्यकर्ते समाजसेवक विठ्ठल देसाई, यल्लाप्पा धामणेकर, सागर गोरल, लक्ष्मी कुंडेकर, कृष्णा गोरल, अजित मजूकर, शिवाजी मेलगे, आनंद शहापूरकर, श्रीकांत कुकडोळकर व बेळगांव तालुक्याच्या विविध भागातून आलेले कामगार, विद्यार्थी – विद्यार्थीनी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल पाटील यांनी उपस्थित कामगारांना थोडक्यात मार्गदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta