
बेळगाव : मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलमधील सन 1993 ते 2003 या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच खेळीमेळीत उत्साहाने पार पडले.
स्नेहसंमेलनाची सुरवात राष्ट्रगीतानंतर शाळेचे दिवंगत विद्यार्थी व शिक्षकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
त्यानंतर पहिले ते दहावीपर्यंत आपल्याला शिकवलेल्या शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर करून स्वागत केले. प्रारंभी विनायक जैनोजी यांनी स्वागत तर रमा कणबर्गी यांनी प्रास्ताविक केले. दीप प्रज्वलनाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले.
संमेलनात विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकानीही आपल्या मनोगतात मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. या स्नेहसंमेलनास जवळपास 50 विद्यार्थी आणि 40 शिक्षक उपस्थित होते. मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व वर्गमित्र -मैत्रिणी आणि शिक्षक यांच्यात गप्पा रंगल्या होत्या. प्रत्येकजण आपल्या जीवन प्रवासातील अनुभव एकमेकांना सांगून आपले मन मोकळे करत होता. सुत्रसंचालन रेणुका करडी यांनी केले. शेवटी गणपत चौधरी यांनी आभार मानले. संमेलनानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
Belgaum Varta Belgaum Varta