
डी. बी. पाटील अध्यक्षपदी ; उपाध्यक्ष रोहण कदम तर कार्याध्यक्षपदी आर.के. पाटील
सचिवपदी रवी पाटील व एस. व्ही. जाधव यांची निवड

बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यातील क्षत्रिय मराठा परिषद व बेळगाव जिल्हा क्षत्रिय मराठा परिषदतर्फे सोमवार दि. 16 ऑक्टोबर रोजी डी.बी.पाटील फोटो स्टुडिओ कार्यालयात बेळगाव तालुका क्षत्रिय परिषदेची नूतन कार्यकारिणी निवड जाहिर करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी आमदार व क्षत्रिय परिषद बेळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड. अनिल बेनके होते.
यावेळी उपस्थितांचे स्वागत व संघटनेबद्दल बेळगाव क्षत्रिय परिषद जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यांनी केले. जिल्हा सेक्रेटरी संजीव भोसले यांनी मार्गदर्शन केले.
‘मराठा समाजाच्या हितासाठी पक्षभेद विसरून समाजाचा विकास हाच आमचा ध्यास असून शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व अत्यंविधीचा मोफत खर्च यासाठी बेळगाव मध्ये मराठा भवन उभारण्यात येणार आहे अशी माहिती ऍड. अनिल बेनके यांनी दिली.
नूतन अध्यक्ष डी. बी. पाटील म्हणाले, ‘विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र करून शिक्षण व गोरगरिब , गरजूना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील राहिन, असे प्रतिपादन केले.
यावेळी नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
अध्यक्ष – डी. बी. पाटील, उपाध्यक्ष – रोहण कदम, कार्याध्यक्ष – आर. के. पाटील, सचिव – रवी पाटील, – एस.व्ही. जाधव
सदस्य – शिवसंत संजय मोरे, सचिन देसाई, टी. के. मंडोळकर, उमेश शंकर उचगांवकर, शामराव सुब्राव खांडेकर, सचिन शिवाजी बिर्जे, गणपतराव देसाई, राहूल पवार, गजानन शिवाजीराव बाडिवाले, प्रताप एच. पाटील, नवनाथ खामकर, आण्णाप्पा पाटील
या क्रियाशिल सदस्यांची निवड जाहिर करण्यात आली व यातील काही सदस्यांना जबाबदारी दिली जाणार आहे.
शेवटी आभार प्रदर्शन आर. के. पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta