
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा मद्य वाहतूक करणारा (एम. एच. ४३ वाय – २९७६) क्रमांकाचा ट्रक हिरेबागेवाडी टोलनाक्यावर थांबवून तपासणी केली असता. ट्रकमध्ये बनावट ट्रान्सफॉर्मर ठेवून त्यामधून मद्यसाठ्याची वाहतूक करण्याऱ्या प्रकाराचा पर्दाफाश झाला. यावेळी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन, बेकायदा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक करण्यात आला. श्रीनिवास (रा. मराठवाडा ; ता. बीड, महाराष्ट्र) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अबकारी अधिकाऱ्यांकडून अटक केलेल्या चालकाची चौकशी सुरु आहे.
यावेळी अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, गेल्यावेळी पुष्पा स्टाईलने गोव्यातून बेकायदा मद्य वाहतूक करणारी टोळी यावेळी नवी शक्कल लढवून महागड्या दारूच्या बाटल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये लपवून गोव्यातून तेलंगणाला वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून पाळत ठेवून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली.
Belgaum Varta Belgaum Varta