Wednesday , March 4 2026
Breaking News

आंबेवाडी येथे २२ रोजी मुलांसाठी खुल्या-१४ वर्षांखालील खो-खो स्पर्धा

Spread the love

 

हिंडलगा : आंबेवाडी येथील मराठा स्पोर्ट्स क्लब यांच्या विद्यमाने खास दसऱ्यानिमित्त भव्य खुल्या व १४ वर्षांखालील प्राथमिक मुलांसाठी खो-खो स्पर्धांचे आयोजन फक्त मुलांच्यासाठी करण्यात आले आहे. प्राथमिक गट रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता या स्पर्धा घेण्यात येतील. सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा आंबेवाडी येथे या स्पर्धा होणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ७००० रोख व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ५००० रोख व चषक, उत्कृष्ट रनर १००० रोख व चषक, उत्कृष्ट चेजर १००० रोख व चषक.

१४ वर्षांखालील मुलांनी वयाचा दाखला आणणे बंधनकारक आहे. खुला गट सोमवार दि. २३ रोजी सकाळी दहा वाजता या स्पर्धा घेण्यात येतील. प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रुपये रोख व चषक, द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये रोख व चषक, उत्कृष्ट रनर एक हजार रुपये रोख व चषक, उत्कृष्ट चेजर एक हजार रुपये रोख व चषक अशी बक्षिसे आहेत. तरी इच्छुक संघानी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी विक्रम तरळे व राजू सांबरेकर यांच्याशी ८७४९०२८२२९. ९४४९७३५५४८ या मोबाईलवर क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *