Saturday , December 13 2025
Breaking News

दसरा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Spread the love

 

बेळगाव : गेल्या दोन दशकांपासून बेळगावातील वैशिष्ट्य ठरलेल्या बेळगाव शहर देवस्थान कमिटी व श्री देवदादा सासनकाठी ज्योतिर्लिंग भक्त मंडळाच्या दसरा महोत्सवाची गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

मराठी विद्यानिकेतन येथील दसरा मैदानावर दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी सायंकाळी सहा वाजता ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या दसरा महोत्सवाचे आयोजन केले जाते. शहर देवस्थान व चवाट गल्ली येथील देवदादा सासनकाठी भक्त मंडळाच्या पदाधिकारी यांच्या नेतृत्वातील गेली दोन दशके पासून ही परंपरा सुरू आहे.

दसरा महोत्सवात चवाट गल्ली येथील देवदादा मंदिरातून विधिपूर्वक नंदीचे (कटला) पूजन करून गल्लीतील पारंपरिक पद्धतीने वाद्य व ढोल ताशांच्या गजरात सासनकाठी व पालखीचे भव्य दिव्य मिरवणूक काढली जाते, परंपरेने चालत आली रूढी आजही मारुती गल्लीत चवाट गल्लीतील सासनकाठी व नंदी आल्यावर मिरवणुकीला सुरवात होते. प्रामुख्याने मारुती गल्ली येथील मारुती मंदिराजवळ कपलेश्वर मंदिरातील पालखी, समादेवी गल्लीतील पालखी, मारुती गल्ली मारुती देवाचे वाहन, मातनगीदेवीची पालखी कसाई गल्ली, बसवाण गल्ली येथील बसवाण देवाचे वाहन, या सर्व देवस्थान नाचे पालख्या मारुती गल्ली येथे जमतात, व चवाट गल्लीचा नंदी मिरवणुकीत दाखल झाल्यानंतर नंदीला अग्रस्त ठेवून या सर्व पालख्या मिरवणुकीत दाखल होतात.
एकाचवेळी पालखीचे कौशल्य एकाचवेळी मिरवणुकीतील हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदाय लोकांना कौशल्य बघण्याची संधी वर्षातून एकदाच मिळत असल्यामुळे दसरा महोत्सवाला मोठ्या प्रमाणावर मराठी विद्यानिकेतच्या मैदानावर गर्दी होत असते. एवढ्या मोठ्या संख्येत बेळगावातील अन्यत्र कुठेही दसऱ्याला असे आयोजन होत नाही.

ही पारंपरिक दोन दशकाची परंपरा जतन राहावे, व पुढे असाच वैभव वाढावा हाच या उत्सवामागील मुख्य उद्देश देवदादा सासनकाठी भक्त मंडळ चवाट गल्ली पदाधिकाऱ्यांचा आहे. या अनमोल ठेव्याचे जतन करण्याच्या उद्देशा दरवर्षी आयोजन होत असते.

About Belgaum Varta

Check Also

दिवंगत शांताबाई नंदिहळ्ळी यांना शोकसभेत श्रद्धांजली

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात दिवंगत शांताबाई (आक्का) परशुराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *