
बेळगाव : विश्वकर्मा सेवा संघाची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीमध्ये सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विश्वकर्मा समाजाने कशाप्रकारे पुढे यावे आणि हे सरकारने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून द्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी युवा परिवर्तन या संस्थे मार्फत मीनाताई बेनके यांच्याहस्ते शिवण क्लासचे सर्टिफिकेट महिलांना देण्यात आले. प्रारंभी त्या बोलताना म्हणाल्या की, या सर्टिफिकेटचा मुख्य फायदा हा महिलांना आहे. सर्टिफिकेटच्या माध्यमातून कोणतेही महिला रोजगाराची सुरुवात करू शकते. तसेच सर्टिफिकेटच्या आधारावर कोणतीही बँक दीड लाख रुपये कर्ज देऊ शकते. श्री विश्वकर्मा सेवा संघाचा हा मुख्य ध्येय आहे. त्यामुळे महिलांनी आणि युवतीने सरकारने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करावी, असे मार्गदर्शन यावेळी मीनाताई बेनके यांनी उपस्थित महिलांना केले.
यावेळी विश्वकर्मा सेवा संघ अध्यक्ष रमेश देसुरकर, संदीप मंडोळकर, राजु सुतार, नामदेव सुतार, पप्पू लोहार, प्रकाश बेळगावकर, विश्वकर्मा सेवा संघ महिला अध्यक्ष माधुरी सुतार, सोनाली मंडोळकर, नेहा देसुरकर, गीता सुतार यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta