
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या अभिषेक गिरीगौडर, अनिरुद्ध हलगेकर, भावना बेरडे यांची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या जिल्हास्तरीय अथेलिटीक स्पर्धेत प्राथमिक गटात संत मीरा शाळेच्या भावना बेरडे हिने 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, व लांबउडी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे,तर मुलांच्या गटात 80 मीटर अडथळा शर्यतीत अनिरुद्ध हलगेकर यांने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे,तर माध्यमिक मुलांच्या गटात 110 मीटर अडथळा शर्यतीत अभिषेक गिरीगौडरने प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर उंच उडीत अश्विन जायण्णाचे यांने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

आता उडपी येथे 31 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी अनिरुद्ध, भावना, पात्र ठरले आहेत वरील खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट, शिवकुमार सुतार यश पाटील यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी व संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे शाळा सुधारणा समिती सदस्य व शिक्षक वर्गांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta