Tuesday , March 3 2026
Breaking News

प्रादेशिक आयुक्तांनी महापालिकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा

Spread the love

 

माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने प्रादेशिक आयुक्तांना निवेदन सादर

बेळगाव : बेळगाव महापालिकेत प्रशासन आणि विरोधकांमध्ये विविध कारणांवरून संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक संघटनेने आज बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एस. बी शेट्टण्णावर यांची भेट घेतली.

महापालिकेतील संघर्षाबाबत महापौर शोभा सोमनाचे आणि सत्ताधारी नगरसेवकांनी यापूर्वी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यपाल थावरचंद गहेलोत यांची भेट घेऊन करवाढीच्या शिफारसीच्या ठरावावरील महापौरांच्या सहीची फाईल गहाळ झाल्याची तक्रार केली होती. दुसरीकडे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून महापालिका आयुक्तांनी फाईल गहाळ झाल्याने कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगिरी यांच्या विरोधात मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या घडामोडींमुळे संतप्त झालेल्या माजी नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्तांना अधिकारांचा वापर करून महापालिकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच दोन गटातील गोंधळ मिटवावा अशी विनंती केली. यावेळी उपरोक्त मागणीचे निवेदन प्रादेशिक आयुक्तांना सादर करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना माजी महापौर नागेश सातेरी म्हणाले, बेळगाव महापालिकेतील सध्याच्या घडामोडींमुळे सर्वांनाच वेदना होत आहेत. कर्नाटकच्या इतिहासात प्रथमच महापौरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सत्ताधारी -विरोधी गटातील गदारोळामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले असून अधिकारी बडतर्फ झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटातील नगरसेवकांना स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे बोलावून चर्चेच्या माध्यमातून कामकाज सुरळीत होण्यासाठी निर्देश द्यावे तशी विनंती त्यांनी केली.

याप्रसंगी माजी आमदार रमेश कुडची म्हणाले, बेळगाव महापालिकेतील घडामोडी खेदजनक आहेत. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवणे हा सभागृहाचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांनी महापालिकेतील या संघर्ष आणि घडामोडींंवर घालण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी माजी महापौर मालोजी अष्टेकर, वंदना बेळगुंदकर, शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, मधुश्री पुजारी, नेताजी जाधव, संभाजी चव्हाण, दीपक वाघेला, मोहन बेळगुंदकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *