बेळगाव (प्रतिनिधी) : समादेवी गल्लीतील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी समाज महिला मंडळ, वैशवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवारी रोजी टिळकवाडीतील रामनाथ मंगल कार्यालय येथे कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी येथील वैश्य समाजाचे जेष्ठ सदस्य अनंत उचगांवकर, युवा वैश्य वाणीचे अध्यक्ष रोहन जुवळी, सेक्रेटरी अमित कुडतूरकर, समाजाचे मोतीचंद्र दोरकाडी, मोहन नाकाडी, आणि वैश्यवाणी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्वला बैलूर, सेक्रेटरी लक्ष्मी बेडेकर, रवी कलघडगी, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी श्री समादेवी संस्थान व वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत गीतानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते श्री समादेवी मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली. अध्यक्ष दत्ता कणबर्गी यांनी उपस्थित त्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश प्रगट केला. याप्रसंगी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रमानंतर वैशवाणी समाजामध्ये 2022- 2023 मध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ओम बाप शेट, सदानंद कादौळकर, विनीत हणमशेट, मनस्वी अंगडी, अनिकेत पिळणकर, सिद्धी आंगडी, ज्योती आळवे, श्रीशा मुरकुंबी, सानिका मिठारे, रचना गावडे साक्षी बिडीकर, योगेश गावडे, राहिली कुडतूरकर, यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ शाल भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जीवन संगीत हा कार्यक्रम डॉक्टर संतोष बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदररित्या सादर करण्यात आला. या कार्यक्रमात महिला पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी आनंद लुटला. यावेळी रोहन जुवळी व उज्वला बैलूर यांची सुद्धा भाषणे झाली. समारंभाच्या शेवटी स्नेहभोजन व दूध वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद निखागे यांनी तर आभार अमित कुडतूरकर यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदेश पाटणकर, सुयश पानारी, कमलाकांत घेवारी, राहुल गावडे, परेश नार्वेकर, राकेश कलघडगी, विनायक शहापूरकर, प्रसाद निखागे, अमित गावडे, आनंद गावडे, गुरुदत्त सटवानी, अमित बेडीकर, रुपेश बापशेट, राकेश बापशेट, राकेश असुकर, सचिन कुडतूरकर, संतोष नार्वेकर, संदीप कडोलकर इतर सदस्यांनी विशेष परीश्रम घेतले.