बेळगाव : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे -पाटील यांनी उभे केलेले आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलेले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बेळगाव येथे कॅन्डल मोर्चा घेण्यात येणार होता परंतु महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाची दिशा 24 डिसेंबर नंतर ठरणार असल्यामुळे हा कॅन्डल मोर्चा काही काळ स्थगित ठेवून महाराष्ट्राच्या आंदोलनाबरोबर पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
रविवार दिनांक पाच रोजी कॅन्डल मोर्चा काढण्यात येणार होता त्यासंबंधी आज रंगुबाई पॅलेस येथे बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना प्रकाश मरगाळे म्हणाले, हे आंदोलन अतिशय समंजसपणे आणि निश्चित दिशेने चाललेले आहे त्यामुळे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे दिशा ठरवण्यात येईल त्याप्रमाणे बेळगावतही आंदोलन घेण्यात येईल त्याचबरोबर सीमा भागातील मराठी माणूस आणि त्याच्या समस्या याबाबत राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान व गृहमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे बिदरहून आलेल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे दिलेल्या पत्राची ही दखल घेण्यात आली.
बैठकीत उपस्थित असलेल्या सभासदांनी आपली मते मांडली त्यात सीमा भागात जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले याप्रसंगी गुणवंत पाटील, नेताजी जाधव, शिवराज पाटील, संजय मोरे, रवी पाटील, गणेश दड्डीकर, सतिश पाटील आधी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta