बेळगाव : पीयूसी प्रथम वर्षातील हुशार विद्यार्थ्यांना पात्रता चाचणीद्वारे शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय केएलई संस्थेने घेतला आहे अशी माहिती केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी दिली.बेळगावात मंगळवारी केएलई संस्थेच्या आरएलएस कॉलेजच्या सभागृहात पत्रकार परिषदेला संबोधित करताना केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ म्हणाले की, 1916 मध्ये स्थापन झालेल्या केएलई संस्थेने आज 309 सदस्य संस्थांसह शिक्षण-आरोग्य-संशोधन क्षेत्रात जागतिक ओळख मिळवली आहे. आमच्या केएलई संस्थेची 30 विज्ञान महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक महाविद्यालयांनी यावर्षी 90 टक्क्यांहून अधिक निकाल मिळवले आहेत. अनेक विध्यार्थ्यानी जेईई आणि एनईईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवले आहेत. आज शिक्षणात अनेक बदल झाले आहेत. व्यावसायिक शिक्षणात बरेच बदल होत आहेत. प्रत्येक वेळी नवीन अभ्यासक्रम येत आहेत. स्पर्धात्मक शिक्षण घेणे हे विद्यार्थ्यांचे जीवन ध्येय बनले आहे. अशा परिस्थितीत स्वतःला घडवण्याची आज गरज असल्याचे ते म्हणाले.
बेळगावातील केएलईच्या जक्केरी होंडा येथील पीयू कॉलेजच्या समृद्धी देसाई हिने नीट परीक्षेत 720 गुणांपैकी 705 गुण मिळवले आणि राष्ट्रीय स्तरावर 163 वा आणि राज्यातील महिला विद्यार्थ्यांमध्ये 1ला क्रमांक मिळवला असून, तिला पुद्दूचेरी येथील जिफमेर विद्यापीठ येथे वैद्यकीय प्रवेश मिळवला आहे. यावर्षी नीट परीक्षेत 600 पेक्षा जास्त गुण मिळवणारे 20 हून अधिक विद्यार्थी आहेत आणि 500 पेक्षा जास्त गुण मिळवणारे 50 हून अधिक विद्यार्थी आहेत. आतापर्यंत 71 विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतला आहे, 21 बीडीएस (दंतचिकित्सा) मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, नर्सिंगमध्ये 169 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे आणि बी.फार्ममध्ये 160 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. केएलईच्या विद्यार्थ्यांनी सीईटीमध्येही अभूतपूर्व निकाल मिळविला आहे. सीईटीमध्ये 5000 पेक्षा कमी रँक मिळालेले 60 विद्यार्थी आहेत. सुमारे 1600+ विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. एनआययुआयटीमध्ये 5 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि जेईईमध्ये चांगले गुण मिळवून 3 विद्यार्थ्यांना आयआयआयटीमध्ये प्रवेश मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला केएलई संस्थेचे माजी सदस्य एम. सी. कोळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta