
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती स्पोर्ट्स अकॅडमी आणि सह्याद्री आंतरराज्य बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था पुरस्कृत खेलोत्सव क्रीडा स्पर्धांना मराठी विद्यानिकेतनच्या क्रीडांगणावर उत्साहात सुरुवात झाली. यावेळी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील हे होते. ज्योती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एम. बी. निर्मळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तर मराठी विद्यानिकेत विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अनंतराव पाटील यांच्या हस्ते कबूतर आकाशात सोडून या क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन करण्यात आले. तर मंडळाचे संचालक पी. पी. बेळगावकर आणि सह्याद्री पतसंस्थेच्या उपाध्यक्ष सुजाता मायनाचे यांनी क्रीडा ज्योतीचा स्वीकार केला. याप्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील सर सहसचिव डॉक्टर दीपक देसाई, संचालक बाळाराम पाटील, लायन वैशाली नायडू, अनिल कणबरकर, श्रीयुत बांडगी, किरण पाटील, शितल कोकितकर, सुजाता मायानाचे आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाले होते.
यावेळी मंडळाचे संचालक पी. पी. बेळगावकर, संचालक एम. बी. निर्मळकर, प्राचार्य आनंदराव पाटील यांची खेळाडूंना मार्गदर्शन करणारे भाषणे झाली तर ऍड. राजाभाऊ पाटील यांचे अध्यक्ष भाषण झाले. बैलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर बेनकनहळ्ळी हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. आर. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta