निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर ते गोंदिकुप्पी या अंतरात सध्या पवनचक्कीद्वारे वीज पुरवठा करण्यासाठी विंडपाॅवर (खांब) उभारण्याचे काम सुरू आहे. अज्ञात चोरट्यांनी या परिसरात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणावरून पवनचक्कीचे लाखो रुपये किंमतीचे विविध प्रकारचे साहित्य चोरून नेले आहे. याबाबत ग्रामीण पोलिसात फिर्याद नोंद झाली आहे.
विंड्रन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून खाजगी तत्वावर हेस्काॅमला वीज वितरणासाठी पवनचक्की उभारण्याचे काम चालू आहे. चोरट्यांनी नेमकी संधी साधून पवनचक्कीसाठी लागणारे कॉपर वायर, ऑईल, टाॅवरसाठी लागणारे साहित्य तसेच पंख्यासाठीचे साहित्य असे विविध प्रकारचे साहित्य लंपास करून पोबारा केला आहे. याबाबत रितसर संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.