बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांचे कट्टर समर्थक भाजप कार्यकर्ते पृथ्वी सिंह यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
एस सी मोर्चा भाजपचे पदाधिकारी पृथ्वी सिंह (वय 55) चाकू हल्ल्यात जखमी झाले असून उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदेश भाजप अध्यक्ष बी. एस. विजयेंद्र यांनीही इस्पितळात भेट देऊन पृथ्वी सिंह यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.
बेळगावातील एका विधान परिषद सदस्याच्या समर्थका कडून चाकू हल्ला झाल्याचा आरोप पृथ्वी सिंह यांनी व्हिडीओद्वारे केला आहे.
विजयनगर हिंडलगा येथील पृथ्वी सिंह यांच्या घराजवळ सदर घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत पृथ्वी सिंह यांच्या दंडावर चाकूने सपासप वार करण्यात आले असून या घटनेत सिंह जखमी झाले आहेत.
इस्पितळात विधान परिषद सदस्य चालुवराय नारायण स्वामी केशव प्रसाद यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या हल्ल्याची चौकशी करा अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.