बेळगाव : गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे नोंद होऊ लागले आहेत.
सोमवारी सकाळी शिवसेना कोल्हापूर संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह शेकडो बेळगावातील मराठी भाषकांनी आंदोलन करत शिनोळी येथे रास्ता रोको केला होता.
दरम्यान, चंदगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय देवणेसह इतर 40 जणांवर गुन्हा दाखल यामध्ये बेळगाव मधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा ही समावेश आहे.सोमवारी महाराष्ट्र येऊन रास्तारोको केल्याने कोल्हापुरातील चंदगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोमवारी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर समिती व शिवसेनेकडून रास्तारोको करण्यात आलेला होता. यावेळी महाराष्ट्र सरकार विरुद्ध घोषणा ही दिल्या जात होत्या. बेळगावात मात्र कर्नाटक पोलीस गुन्हे दाखल करण्याची मालिका चालू असतानाच आता महाराष्ट्र पोलीसातही गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गु.रं.नं.कलम:-434 /2023 भा.द.वि.स. कलम, 341,143,147,188 महा. पोलीस अधि. 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
शिवसेना नेते विजय देवणे, रा. कोल्हापुर, 2) प्रभाकर खांडेकर रा. शिनोळी खुर्द ता. चंदगड, 3) विक्रम मुतकेकर रा. विनायक नगर चंदगड, 4) दिनकर पावसे, 5) आर. एम. चौगुले, 6) चंद्रकांत कोंडुसकर, 7) रमाकांत कोंडुसकर, 8) श्रीपाद आप्टेकर, 9) शुभम शेळके, 10) लक्ष्मण मनवाडकर, 11) दिगंबर पाटील 12) नेताजी जाधव, 12) गोपाळ देसाई, 14) मालोजीराव माने, 15) प्रकाश मरगाळे, 16) सरीता पाटील, 17) निखील देसाई, 18) प्रकाश आष्टेकर, 19) मुरलीधर पाटील, 20) मनोहर किणेकर आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta