बेळगाव : समर्थ नगर पहिला क्रॉस येथे मीनाताई बेनके यांच्या हस्ते चिमूकल्यानी साकारलेल्या कोंढाणा किल्ल्याचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी मीनाताई बेनके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे उद्घाटन केले.
यावेळी चिमुकल्यांनी साकारलेल्या संपूर्ण किल्ल्याची माहिती यांना दिली. यावेळी चिमुकल्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्व इतिहास माहिती असल्याने चिमुकल्याचे कौतुक केले.
यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने त्या बोलत असताना चिमुकल्याना त्यांनी मार्गदर्शन केले आणि अशाच प्रकारे दरवर्षी वेगवेगळे किल्ले साकारावे असे प्रोत्साहन त्यांनी सर्वांना दिले.
Belgaum Varta Belgaum Varta