केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नक्वी यांना शरद पवारांचे पत्र
बेळगाव : सोमवार दि. 13 रोजी बेळगाव येथे महामेळाव्याच्या ठिकाणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर कन्नड संघटनेच्या गुंडांनी शाईफेक केली त्यानंतर सीमावासीय युवकांचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले. त्यांनी काल महाराष्ट्राचे खासदार अरविंद सावंत यांची भेट घेतली. आज केंद्रीय मंत्री आणि सर्वपक्षीय खासदारांची भेट घेण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांची भेट घेऊन सादर घटनेची कल्पना देण्यात आली. सीमावासीयांवर होणारा अन्याय लक्षात घेता भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय चेन्नईला हलविण्याचा घाट रद्द करावा. भाषिक अल्पसंख्याक म्हणून सीमावासीय मराठी भाषिकांना योग्यतो न्याय द्यावा. कर्नाटकात सीमावासीयांवर भाषिक अल्पसंख्याक म्हणून होणारा अन्याय आणि मराठी भाषिकांवर अपमानास्पद वागणूक होत आहे अश्या आशयाचे पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सीमावासीयांचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांना दिले.
तसेच या प्रकरणी योग्य तो पाठपुरावा करू असे आश्वासनही दिले आहे.
या शिष्टमंडळात तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, बेळगाव बिलोनग्स टू महाराष्ट्रचे पियुष हावल, निवडणूक राजनीतीकार संकेत जाधव आदी उपस्थित होते.
Check Also
बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे संस्थेचा 25 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
Spread the love पुणे : बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे या संस्थेचा 25 वा …