बेळगाव : राज्यातील संभाव्य पाणीटंचाई गावांची यादी तयार करण्यात आली आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात तहानलेल्या गावांची संख्या 6237 इतकी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी 24 तासात टँकरने पाणीपुरवठा आणि खाजगी कुपनलिका ताब्यात घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना बजावले आहेत. तसेच आंतरराज्य चारा वाहतुकीचे निर्बंधचे आदेश 23 नोव्हेंबरला देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खात्यामध्ये 880 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे, अशी माहिती महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे.