Wednesday , March 4 2026
Breaking News

रक्तदानासाठी स्वयंप्रेरणेने पुढे या : विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते. त्यामुळे स्वयंप्रेरणेने रक्तदान करण्यास पुढे आले पाहिजे. आपणही विद्यार्थी जीवनात अनेक वेळा रक्तदान केले असून, अनेक रक्तदान शिबिरे भरविल्याचे विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी बिम्स सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले.
अलायन्स क्लब, रेड क्रॉस व बिम्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिरामध्ये 300 हून अधिक जणांनी रक्तदान केले. प्रारंभी अलायन्स इंटरनॅशनलचे चेअरपर्सन ऍड. दिनकर शेट्टी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला विधानपरिषद सदस्य मंजुनाथ भंडारे, बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री कालकुंद्रीकर यांनी केले तर ऍड. रवींद्र तोटेगार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला संचालिका डॉक्टर नवीन शेट्टीगार, बिम्स संचालक डॉक्टर अशोक कुमारशेट्टी, अधीक्षक डॉक्टर ए. बी. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विठ्ठल शिंदे, डॉक्टर जी. आर. पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *