बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बेळगाव येथे आयोजित विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकार विरोधात भाजप आणि निजद असा सामना अधिवेशनात पाहायला मिळाला. मात्र अधिवेशनाचे सूप वादळी चर्चेने वाजवण्याची शक्यता आहे.
विरोधकांनी कायदा सुव्यवस्था, लिंगायत आरक्षण, ऊस उत्पादक, दुष्काळ आणि उत्तर कर्नाटक विषयावरील प्रश्नांवर या अधिवेशनात चर्चा झाली. तसेच विविध महत्त्वाची विधेयके संमत झाली आहे.राज्यात दुष्काळ भीषण पाणी टंचाई असताना बेळगाव अधिवेशन घेणार की नाही याबाबत चर्चा होती.मात्र अधिवेशनाची घोषणा करण्यात आली. चार डिसेंबर पासून अधिवेशन ही सुरू झाले.या अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. अधिवेशन एक किंवा दोन आठवड्यांनी वाढविले जावे. एक महिना अधिवेशन व्हावे अशी विरोधी पक्ष नेत्यांनी सातत्याने मागणी केली. मात्र सरकार तर्फे त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज शुक्रवारी दुपारीच अधिवेशनाचे सूप वाजण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta