अथणी : तालुक्यातील शेगुणसी गावात एका खासगी शाळेची बस पलटी झाली. सुदैवाने अपघातातील विद्यार्थी व चालक सुखरूप बचावले.
ही घटना सोमवारी सकाळी घडली असून बसमध्ये चालक आणि व्यवस्थापकासह 10 विद्यार्थी होते. सुदैवाने बस पलटी झाल्याने कोणतीही हानी झाली नाही.
तालुक्यातील अनेक भागात खासगी कंपन्यांनी डोके वर काढले असून बसचालकांना लगाम नाही. बस अतिवेगाने चालवत असल्याने मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
याबाबत शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने खासगी शाळांना सावध केले तरच भविष्यातील धोके टाळता येतील. जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta