
बेळगाव : बेळगावातील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना सरकारी योजनेतून घरे देण्याच्या मागणीचे निवेदन आज बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांना देण्यात आले. झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याच्या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यासाठी अनेक झोपडपट्टीवासीय आज महानगरपालिकेत आले होते. मात्र त्यावेळी मंत्री जारकीहोळी अनुपस्थित होते. त्यामुळे आमदार राजू सेठ यांनी निवेदन स्वीकारून मंत्री व शासनाकडे देऊन यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विष्णू इंगळे यांनी आ. राजू सेठ यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, केंद्र सरकार पुरस्कृत राजीव आवास योजनेंतर्गत कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाने बांधलेली घरे मोडकळीस आली आहेत. तेथे अनेक गैरप्रकार घडत आहेत. सागर नगर झोपडपट्टीत अनेक गोरगरीब नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र तेथे रस्ते, गटारींची दुरवस्था झाल्याने महिला व अन्य रहिवाशांचे हाल होत आहेत. त्याशिवाय अनेक वर्षांपूर्वी अर्ज करूनही अनेक गोरगरिबांना सरकारी घरे मंजूर झालेली नाहीत. ही समस्या सोडविण्याची विनंती त्यांनी केली.
यावेळी व्यंकटेश मिरियाल, गौरम्मा कडमंची, संगीता टीके, रेखा आलट्टी, गुंडप्पा शिरवटे, लक्ष्मी मिरियाल, यल्लव्वा बगाडी, शिल्पा कडमंची आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta