
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत (इस्कॉन)च्या वतीने आयोजित करण्यात आलेली श्रीकृष्ण यात्रा महोत्सव 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. 10 फेब्रुवारी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून यात्रेस प्रारंभ होईल. शहराच्या विविध भागात फिरून सायंकाळी साडेसहा वाजता रथयात्रा इस्कॉनच्या पटांगणावर पोहोचेल. तेथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी यज्ञ, भजन, कीर्तन, प्रवचन नाट्यलीला आदी कार्यक्रम होणार आहेत . या महोत्सवाला देश-विदेशातून अनेक भक्त उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta