Saturday , March 7 2026
Breaking News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कट्टर कार्यकर्त्याचे हृदयविकाराने निधन

Spread the love

 

बेळगाव : भोज गल्ली शहापूर येथील रहिवाशी, श्रीराम सेना हिंदुस्थानचा कार्यकर्ता अभिजीत पुजारी (वय 26) यांचे हृदविकाराने मंगळवारी अकाली निधन झाले.

अभिजीत हा युवक मनमिळावू स्वभावाचा म्हणून लोकांच्यात परिचित होता त्यामुळे त्याचा मित्रपरिवार देखील मोठा होता. श्रीराम सेना हिंदुस्थानचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर आणि चंद्रकांत कोंडुसकर यांचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्याची ओळख होती.

शिवभक्त म्हणून ओळख असणाऱ्या अभिजीतने नेहमीच शिवजयंतीच्या काळात घरचे कार्य समजून त्यात भाग घेतला. ज्यावेळी बंगळुरु येथे शिव पुतळ्यांची विटंबना झाली त्यावेळी धर्मवीर संभाजी महाराज चौकात केलेल्या आंदोलनात त्याला अटक झाली आणि 47 दिवसाचा तुरुंगवास घडला. त्याला याविषयी छेडले असता “राजाचे कार्य आणि दादाची साथ आम्हा तरुणांना असेल तर तुरुंगवास आम्हाला पर्यटनासारखा वाटतो” हे त्याचे उद्गगार शिवकार्याविषयी आणि कोंडूस्कर यांच्या विषयी आदर व्यक्त करणारे होते.

आपल्या लाघवी स्वभावाने सर्वच स्तरातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अभिजीत याचे जाणे अनेकांच्या काळजाला चटका लावून गेलं.

त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. मंगळवारी सायंकाळी शहापूर स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कलखांब गावच्या राहुल पाटीलचे युपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश; 224 वा क्रमांक

Spread the love  बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *