
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे दरवर्षी प्रमाणे आनंदवाडी कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला आहे.
तेरा व चौदा जानेवारीला राज्यस्तरीय गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. हिंदवाडी येथील आखाड्यात स्पर्धा संपन्न होणार आहेत
कुस्तीची आवड निर्माण व्हावी. तरुणवर्गाने खेळाकडे वळावे याच उद्देशाने गेली तेरा वर्षे सातत्याने या स्पर्धा आयोजित केल्या जातात.
खानापूर, बेळगाव तालुक्यातील पैलवान अधिकाधिक सहभाग घेतात त्या अनुषंगाने आखाड्याच्या देणगीदार डॉ. सोनाली सरनोबत यांना निमंत्रित करण्यात आले आहे व आखाड्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी, उपाध्यक्ष नवरत्न सिंह पनवार, उपसेक्रेटरी भावेश बिर्जे, सुहास हुद्दार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta