
बेळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी (आयआरसीएस) बेळगाव जिल्हा शाखेला 2021-22 या वर्षातील सर्वांगीण उपक्रमांच्या श्रेणीमध्ये ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा शाखा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
राजभवन, बेंगलोर येथे गेल्या मंगळवारी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून आयोजित सोहळ्यात कर्नाटकचे राज्यपाल आणि रेड क्रॉस सोसायटी, कर्नाटक राज्य शाखा, बेंगळुरूचे अध्यक्ष थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते भारतीय रेड क्रॉस सोसायटी बेळगाव जिल्हा शाखेच्या सदस्यांना ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा शाखा पुरस्कार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बी. कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी सचिव डॉ. सुमंथ एस. हिरेमठ, कोषाध्यक्ष, श्रीमती प्रिया ए. पुराणिक, कार्यकारिणी सदस्य विकास कलघटगी आदी जिल्हा शाखेच्या सदस्यांसह आयआरसीएस कर्नाटक राज्य शाखा आणि इतर जिल्हा शाखांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta