पुण्यातील स्पर्धेसाठी बेळगाव वकील संघ रवाना
बेळगाव : ऍडव्होकेट युनायटेड इलेव्हन पुणे महाराष्ट्र व पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वकिलांची राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी बेळगाव बार असोसिएशनचा संघ रवाना झाला. या संघाला ज्येष्ठ वकील डी. एम. पाटील, ऍड. आर. पी. पाटील, ऍड. सी. बी. बागेवाडी यांनी शुभेच्छा दिल्या. ऍड. मारुती कामाण्णाचे यांनी या खेळाडूंना प्रथमोपचार कीट दिले.
पुणे येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून १०० संघ दाखल होत आहेत. या स्पर्धेमध्ये बेळगावच्या वकील संघालाही आमंत्रण देण्यात आले आहे. मागील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्यामुळे यावेळीही आमंत्रण देण्यात आले असून हा संघ रवाना झाला आहे.
शनिवारी ऍड. लक्ष्मण पाटील, ऍड. शिवाजी शिंदे, ऍड. रतन मासेकर, ऍड. शिवाजी पाटील, ऍड. गजानन जाधव, ऍड. कपिल वाळवेकर, ऍड. संतोष भागण्णावर, ऍड. गुरुराज पोतदार, ऍड. किरण पुजारी, ऍड. सुनील सकरी, ऍड. गदगय्या एणगीमठ यांच्यासह इतर खेळाडू रवाना झाले आहेत.