Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सभा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : येथील बेळगाव जिल्हा अर्बन व सौहार्द सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी मराठा को-ऑप. बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष आणि बसवेश्वर सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन श्री. बाळाप्पा कगणगी हे होते. सभेची सुरुवात श्री. कगणगी आणि इतर संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाली. मानद अध्यक्ष मल्लिकार्जुन चुनमुरी यांनी प्रास्ताविक केल्यानंतर बाळाप्पा कगणगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन ॲडव्हायझरी कमिटीचे एम. एस. शेठ यांनी केले. 27 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या असोसिएशनच्या मागील वर्षीच्या कामकाजास मंजुरी देण्यात आल्यानंतर गतवर्षीचा जमा खर्च व अंदाजपत्रकाचे वाचन करण्यात आले. त्याचबरोबर असोसिएशनसाठी ऑडिटरची नेमणूक करण्यात आली.
2022-23 या काळात असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेमिनार आणि प्रशिक्षण कार्यक्रमाबाबतची माहितीही यावेळी देण्यात आली. त्यानंतर असोसिएशनच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध संस्थांच्या अध्यक्षांना व इतरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
जिल्ह्यातील बँकांचा अभ्यास करून पाच विभागात उत्कृष्ट बँका म्हणून मुरगोडच्या श्री महांत शिवयोगी सहकारी बँक, हुक्केरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बेळगावच्या पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, मराठा को-ऑपरेटिव्ह बँक आणि राणी चन्नम्मा महिला सहकारी बँक यांच्या चेअरमन यांना सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. बेळगाव जिल्हा सहकार रत्न हा पुरस्कार महावीर को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री. बाळासाहेब पाटील यांना देण्यात आला. अत्युत्तम सेक्रेटरी म्हणून शांतपणा मिरजी बँकेचे कुमार नर्सिंग कुंभार, बेस्ट को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून मराठा को-ऑपरेटिव्ह बँक आणि राणी चन्नम्मा महिला सहकारी बँक यांना देण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री अनंत लाड, शितल निलजी व इतरांची भाषणे झाली. उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब काकतकर यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर बँकेच्या प्रगतीबाबतच्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या बैठकीस व्यासपीठावर सेक्रेटरी राजू होळकर, खजिनदार अमरनाथ महाजन शेट्टी, गोकाक अर्बन बँकेचे एस. एस. पाटील, बी. ए. भोजकर हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक बँकांचे संचालक, सी ई ओ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *